ADIVARE SHIVSENA : आडिवऱ्यात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का
वाडापेठच्या माजी सरपंचांच्या हाती शिवधनुष्य
भालावलीत विभागप्रमुखांचा जय महाराष्ट्र
विशेष प्रतिनिधी
आडिवरे - ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजापूर - लांजा - साखरपा विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. आडिवरे हा ठाकरेंच्या शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात असला तरीही आडिवरे परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत आडिवरे परसरातून ठाकरेंच्या शिवसेनेसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे आव्हान असणार आहे.
पाहा - दिवाळी धमाका, अवश्य भेट द्या
ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि वाडापेठचे माजी सरपंच विश्वास दळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. विश्वास दळवी हे आडिवरे परिसरातील ठाकरेंच्या शिवसेनेचे विश्वसनीय नाव मानले जाते. मात्र विश्वास दळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार किरण सामंत आणि तालुकाप्रमुख दीपक नागले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आडिवरे परिसरातील ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातो.
त्याचबरोबर भालावलीमध्येही ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे भालावली विभागप्रमुख अमोल नार्वेकर यांनी शिवधनुष्य हाती घेत ठाकरेंच्या शिवसेनेला अखेर जय महाराष्ट्र केला. किरण सामंत यांच्या नेतृत्वात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
पाहा - दिवाळी धमाका, अवश्य भेट द्या
'ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यांना पश्चाताप होणार नाही, तुमच्या गावाचा विकास करणे ही माझी जबबदारी आहे आणि ती मी पूर्ण करणार आहे,' असे आश्वासन किरण सामंत यांनी दिले.
यावेळी भालावली ग्रामपंचायत सदस्य अश्विनी हळदणकर, शाखाप्रमुख सुनील भोसले, युवासेना रुपेश गुरव, काँग्रेसचे माजी ग्रामपंचायत सदस्य कमलाकर हातीस्कर, अश्विनी हळदणकर, नितेश गुरव, प्रसाद भोसले, माधुरी भोसले, रंजीत भोसले यांच्यासहित शेकडो ग्रामस्थांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
0 Comments