thackeray mashal : हर घर मशाल अभियानाचा शुभारंभ
- संदीप शेमणकर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून शिवसेना नेते तथा खासदार विनायक राऊत तसेच शिवसेना उपनेते तथा आमदार राजन साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघामध्ये हर घर मशाल या अभियानाचा शुभारंभ मुंबईत पार पडला.
दादरचे शाखाप्रमुख प्रवीण शेट्ये यांच्या माध्यमातून शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्यासाठी राजापूर लांजा साखरपा विधानसभा संपर्क कार्यालय आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. मुंबईमधील सर्व पदाधिकारी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मशाल हे चिन्ह येणाऱ्या काळात घराघरात पोहचवून पक्षाचा प्रसार गावोगावी करावा, अशा सूचना आमदार साळवी यांनी दिल्या.
http://loan.gromo.in/zc/dj0j3B0N3j
यावेळी राजापूर तालुका संपर्कप्रमुख अनिल भोवड, लांजा तालुका संपर्कप्रमुख जगदीश जुलूम, संगमेश्वर तालुका संपर्कप्रमुख राजेश शेलार, युवासेना विधानसभा संपर्कप्रमुख संदेश मिठारी, शिवसहकार संघटनेचे जिल्हा संघटक सुधीर मोरे, दादरचे शाखाप्रमुख प्रवीण शेट्ये, रमेश आग्रे, सचिव प्रकाश मेस्त्री, मुंबई मंडळाचे अध्यक्ष राजाराम घाग, तालुका सहसंपर्कप्रमुख नामदेव नार्वेकर तसेच विभाग संपर्कप्रमुख, उपविभाग संपर्कप्रमुख व गावसंघटक उपस्थित होते.
0 Comments