Header Ads Widget

ई - पॉसचा अडथळा : जनतेला धान्य मिळेना


ई - पॉसचा अडथळा : जनतेला धान्य मिळेना

मुंबई -  गेल्या काही दिवसांपासून ई - पॉसच्या मशिनमध्ये अडथळे येत असल्यामुळे रेशन घेणाऱ्या ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसनेने ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिमतर्फे शिधावाटप केंद्रात असलेल्या ई  -  पॉस मशिनमुळे येणाऱ्या अडचणींबाबत निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर चर्चाही करण्यात आली.  

शिवसेना नेते सचिव  ग्राहक संरक्षण कक्षाचे  अध्यक्ष खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कक्षाचे सरचिटणीस विजय मालणकर, लोकसभा समन्वयक अजय शिरोडकर यांच्या सुचनेनुसार घाटकोपर पश्चिम ग्राहक सरक्षण कक्ष येथे विधानसभा संघटक अमित भाटकर यांच्या नेतृत्वाखाली चर्चा करण्यात आली. ई - पॉस मशिनच्या अडथळे तसेच गणेशोत्सवानिमित्त आनंदाचा शिधावाटप याबाबत चर्चा करण्यात आली. शिधावाटप केंद्रामधील मुख्य अधिकारी वानखेडे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचवेळी मुख्य अधिकारी यांनी निर्णय घेतला की प्रत्येक रेशन दुकानदार यांनी मशीन बंद असल्यास ग्राहकांचे रेशन कार्ड चेक करून ऑफलाईन पद्धतीने धान्य देण्यात येईल. यासंदर्भात ग्राहक संरक्षण कक्षाच्या माध्यमातून निवेदन पत्र देण्यात आले. यावेळी घाटकोपर पश्चिम विधानसभा संघटक अमित भाटकर, उपसंघटक  विश्वनाथ जाधव, वार्ड संघटक १२९ प्रशांत शिंदे, वार्ड संघटक १२८  शंकर तेली, वार्ड संघटक १२३ राजेंद्र पेडणेकर, वार्ड संघटक १२४ यशवंत खोपकर, अवंती अमित भाटकर आदी मान्यवर आणि शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात - अभिज्ञान अकादमी


Post a Comment

0 Comments