दीपक नागलेंची रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी नियुक्ती
प्रतिनिधी
रत्नागिरी - शिंदेंच्या शिवसेनेचे राजापूर तालुकाप्रमुख दीपक नागले यांची आता रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दीपक नागले यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अनेक विकासकामांसाठी पुढाकार घेतला. विकासकामांची उद्घाटने केली, काही विकासकामे पूर्णही केली. राजापूर वाटूळ येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टी हॉस्पिटलची मागणीही गेल्या काही महिन्यांपासून दीपक नागले यांनी लावून धरली होती. त्यासाठी त्यांनी पाठपुरावाही केला होता.
दीपक नागले यांनी रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी नियुक्ती झाल्यामुळे राजापूरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
0 Comments