Header Ads Widget

vasai free seminar : युवती - महिलांसाठी मोफत प्रशिक्षण केंद्र


vasai free seminar : युवती - महिलांसाठी  मोफत  प्रशिक्षण केंद्र

नालासोपारा - नालासोपारा पश्चिम येथे धनंजय गावडे मित्र मंडळ, जिजाऊ संस्था, सखी ग्रुप यांच्या वतीन वसई तालुक्यातील युवती आणि महिलांसाठी मोफत शिवणकाम (टेलरिंग) मेहंदी प्रशिक्षण,  ब्युटी पार्लर प्रशिक्षण, केक मेकिंग प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन नालासोपारा समेळगाव येथे नगरसेवक धनंजय गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.  महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून देणे म्हणजे घर आणि कुटुंब सक्षम करणे हा उद्देश यामागे आहे. 

भारी सूट, करा लयलूट

महिला फक्त चूल, मूल, घर या चौकटीत न राहता तिच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने महिला शहरप्रमुख रुचिता नाईक यांच्या संकल्पनेतून मोफत प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले तसेच अल्प दरात अॅडवान्स प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे.

महिलाना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन आर्थिकदृष्ट्या महिला सक्षमीकरण करून त्यांना सक्षम बनवण्यासाठी धनंजय गावडे नेहमीच सहकार्य करत असतात. आजकालच्या धावत्या युगामध्ये अनेक महिला प्रशिक्षणाच्या निमित्ताने एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये एकोपा वाढण्यात मदत होते.

जाहिरात - अमृता कलेक्शन

यावेळी नगरसेवक दिवाकर सिंग, रमेश मल्हार, महिला शहरप्रमुख रुचिता नाईक, अमित नाईक, प्रशिक्षक संगीता गुर्जर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments