Header Ads Widget

RAJAN SALVI : विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक


RAJAN SALVI : विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक

मुंबई - नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक नुकतीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेते डॉ. राजनजी साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी पॉईंट हाटेल सभागृह, दादर, मुंबई येथे पार पडली. सभेचे नियोजन संगमेश्वर चिपळूण विधानसभा सभा संपर्क प्रमुख सुरेश कदम यांनी केले होते,  तर सभेचे आयोजक राजापूर संपर्कप्रमुख अनिल भोवड, लांजा संपर्कप्रमुख जगदीश जुलुम, संगमेश्वर संपर्कप्रमुख राजेश शेलार होते. यावेळी तिन्ही तालुका संपर्कप्रमुख यांनी आपापल्या तालुक्यातील गटनिहाय निवडणुकीचा आढावा सादर केला. 

ओबीसी सेलचे पांडुरंग उपळकर आणि  नगरसेवक बाबा जाधव यांनी मार्गदर्शन केले. अनेक पदाधिकारी यांनी आपले विचार मांडले. राजन साळवी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की विनायक राऊत यांचा पराभव हा सर्वांच्या जिव्हारी लागला आहे. याचा वचपा पुढील येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत विजयी रुपांतर करून काढायचा आहे. गाफील राहून चालणार नाही. आतापासूनच कामाला लागायचे आहे. झालेल्या त्रुटी भरून काढायच्या आहेत. बुथ बैठकांचे आयोजन करायचे आहे. कट्टर शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद आहे. मुंबईकरच किमया घडवू शकतात. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मुंबईकरांनी झोकून देऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

खास सूट, करा लयलूट

सभेला राजापूर लांजा साखरपा विधानसभा संपर्कप्रमुख चंद्रप्रकाश नकाशे, चिपळूण तालुका संपर्कप्रमुख शांतारामजी चव्हाण, संगमेश्वर तालुका मुंबई प्रमुख शांताराम सालप , राजापूर तालुका मुंबई प्रमुख बबन सकपाळ राजापूर महिला संपर्क प्रमुख माधुरी मांजरेकर, समीक्षा सक्रे, लांजा महिला संपर्क प्रमुख शिंदे मॅडम, शिवसहकार सेनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे, अवजड वाहतूक सेनेचे गिरीश विचारे, प्रवीण शेट्ये तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन संदेश मिठारी यांनी केले.

#rajansalvi #ratnagiri #rajapur #shivsena #politics

Post a Comment

0 Comments