विरारमध्ये एकवटले रिफायनरीविरोधक
- संदीप शेमणकर
विरार - बारसू-सोलगाममधील रिफायनरी रद्द करण्याची मागणीवर ग्रामस्थ ठाम असून रिफायनरी प्रकल्प विरोधकांची विरारमध्ये रविवारी बैठक झाली. या बैठकीला संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर रिफायनरीविरोधी आंदोलनाची पुढची दिशा कशी असावी, याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या अधिवेशनकाळात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
राजकीय भूमिकेविषयी जागृती करण्यासाठी गावपातळीवर सर्वांची मते घेऊन एक सर्वसाधारण सभा आयोजित करायचे ठरले असून यात पुढील दिशा ठरविण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.
![]() |
| https://amzn.to/3xh6N1S |
सिडको आणि एमएसआरडीसी प्राधिकरणाला विरोध करणारे ग्रामसभेचे ठराव करायचे ठरले. जर कुणी रिफायनरी जबरदस्तीने राबवू असे म्हणत असेल तर त्यांना शिंगावर घेण्याची तयारी ग्रामस्थांची तयारी असल्याचे ठामपणे या बैठकीत सांगण्यात आले. कोणत्याही दडपशाहीच्या विरोधात भूमिका घेऊ रिफायनरीला विरोध कायम ठेवण्याचे सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने ठरविण्यात आले. त्याचबरोबर रिफायनरी रद्द होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.
![]() |
| जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
विरारमधील बैठकीला बारसू - सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अमोल रमेश बोळे - ग्रामीणअध्यक्ष, वैभव विनोद कोळवणकर - मुंबई अध्यक्ष, सत्यजित चव्हाण - मुख्य मार्गदर्शक, नरेंद्र जोशी - मुंबई सचिव, सूर्यकांत सोडये, शंकर जोशी, विनायक शिंदे,आदेश भोवड, अनिल गोर्ले, श्यामसुंदर नवाळे, स्वप्नील सोगम, सचिन चव्हाण, संतोष गोवळकर, रमाकांत मुळम, अशोक जोशी, आनंद बाणे यांनी मार्गदर्शन केले. तसेच रिफायनरीविरोधी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]() |
| जाहिरात - अमृता कलेक्शन |
AMRUTA COLLECTION https://www.instagram.com/p/C7eT7V-IJrV/?igsh=MW4yYmt1dWU5cnd4OA==




0 Comments