वीज पडली, जीव गेला
साखरीनाटे येथे वीज पडल्यामुळे युवकाचा मृत्यू
- संदीप शेमणकर
राजापूर - राजापूर तालुक्यातील साखरी नाटे येथे आपल्या घराशेजारी छोट्या होडीचे काम करत असताना शेजारी पडलेल्या विजेच्या धक्क्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुबसम मलिक सोलकर (३२) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून तो सौदी येथे शिपवर कामाला असल्याचे समजते.
मुबसम मलिक सोलकर हा नुकताच परदेशातून गावी आलेला होता. दुपारी तो आपल्या घराशेजारी छोट्या होडीत काम करत असताना लगत पडलेल्या विजेच्या धक्क्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्र पाठवण्यात आले होते.
मुबसम याला दोन लहान मुली असून मोलमजुरी करून कुटुंब चालविणाऱ्या आई-वडिलांचा तो मोठा मुलगा होता. त्याचे दोन लहान भाऊ शिक्षण घेत आहेत. मुबसम याच्या आकस्मिक मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे.
0 Comments