वाढत्या तापमानवाढीवर वृक्षारोपण हेच प्रभावी औषध
राजापूर - वाढत्या तापमान वाढीवर वृक्षारोपण हेच औषध असून आत्ता आपण वृक्षारोपण केले पाहिजे. वड, पिंपळासारख्या देशी आणि दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षांची लागवड केल्यास प्रदूषण आणि तापमानाला आळा बसेल. वाढती जमिनीची धूप थांबेल. जमिनीची पाणी धारण क्षमता वाढेल. म्हणूनच सर्वांनी वृक्षारोपणाचा ध्यास घेऊन देशी वृक्षांची लागवड करायला हवी, असे आवाहन सह्याद्री परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोहर खापणे यांनी केले. मनोहर खापणे हे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित 'जागतिक पर्यावरण दिन' कार्यक्रमात वृक्षारोपणप्रसंगी बोलत होते. यावेळी संस्थेचे माजी सरचिटणीस नारायण पांचाळ, माजी ओएस नरेश पाचलकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. ए.येलुरे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ.विकास पाटील, प्रा. मुग्धा देवरुखकर, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी दहा वडाची आणि पाच पिंपळ, पाच नारळ यांचे वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
जाहिरात- अभिज्ञान अकादमी |
0 Comments