मिऱ्या बंदर येथील समुद्रात दोन जण बुडाले
एकाला वाचवण्यात यश, दुसऱ्याचा मृतदेह सापडला
संदीप शेमणकर
रत्नागिरी - पाली चरवेली येथील हे तरुण असल्याचे समजते. मिऱ्या बंदर येथील समुद्रात पाली चरवेली येथील तीन युवक मासे गरवण्यासाठी गेले होते. एक जण बाजूला उभा होता आणि दोघ जण मासे गरवत होते. अचानक मोठी लाट आली. आणि एक जण खाली पडला. त्याला वाचवण्यासाठी दुसराही धावला. पण यात एक जण वाचला. दुसरा लाटेबरोबर समुद्रात वाहून गेला. स्थानिकाच्या मदतीने शोधाशोध केल्यावर एकाचा मृतदेह सापडला. हे दोघेजण पाली चरवेली येथील असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पावसाळी वातावरण असून समुद्रालाही मोठ्या प्रमाणावर भरती असताना मासे गरवण्यासाठी मिऱ्या बंदर येथे खूप जण जात असतात. संध्याकाळी सहा वाजता ही घटना घडली. काही लोकांना समुद्राची माहिती नसते. हौस म्हणून काही जण जात असतात. पावसाळी दिवस आहेत.

0 Comments