Header Ads Widget

मुझ को तो भी लिफ्ट करा दे : एक लिफ्ट, दोन नेते


मुझ को तो भी लिफ्ट करा दे ! एक लिफ्ट, दोन नेते

मुंबई - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनला सुरुवात झाली. विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शेतकरी कर्जप्रश्नावरून आंदोलन केले. मात्र पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर विधिमंडळाऐवजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या लिफ्टमधून एकत्र जाण्याचीच चर्चा जास्त रंगली.

विधिमंडळातील लिफ्टजवळ उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस येऊन थांबले. एकमेकांसमोर आल्यानंतर त्यांनी एकमेकांकडे दुर्लक्ष न करता एकमेकांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात फार चर्चा झाली नाही.शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी संधी मिळेल त्यावेळी एकमेकांवर खरपूस टीका केली. लिफ्टमध्ये झालेल्या या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या भुवया मात्र उंचावल्या होत्या. लिफ्टमधील काही क्षणांच्या भेटीची राज्यभरात मात्र काही तास चर्चा सुरू होती. 

पाटलांनी दिलं चॉकलेट, दानवेंनी दिला पेढा

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या लिफ्टमधील भेटीची चर्चा रंगत असतानाच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेत्यांची भेट घेतली. या भेटीवेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही  आणि मुंबई पदवीधरसाठी उभे राहिलेले अनिल परबदेखील उपस्थित होते. चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षांना चॉकलेच दिले तर अंबादास दानवे यांनी चंद्रकांत पाटलांना पेढा दिला. दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांशी हसतखेळत संवाद साधला. 

ADVT - https://amzn.to/3zklUsl

(अवश्य भेट द्या - भारी सूट, करा लूट https://amzn.to/3zklUsl )

एकूणच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे त्याचबरोबर चंद्रकांत पाटील-दानवे भेट या दोन्ही भेटींची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. इतकेच नव्हे तर हिंदी गाण्यांचे बोलही जोरात म्हटले जात होते. मुझ को तो भी लिफ्ट करा दे, ही दोस्ती तुटायची नाय, चॉकलेट डे, एक लिफ्ट दोन नेते असेही काही  शब्द अनेकांच्या तोडून ऐकू येत होते. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

'लिफ्टमध्ये देवेंद्र फडणवीस आणि आम्ही एकत्र होतो. यावरून अनेकांना असं वाटलं असेल की ते एक गाणं आहे. ना ना करते प्यार…, म्हणजे ज्यांचा काही संबंध नाही. ना ना करते प्यार…, तुम्ही से प्यार कर बैठे, असं काही होणार नाही. ती भेट एक योगायोगाने झालेली भेट होती. ते म्हणतात ना, भिंतीला कान असतात. मात्र, लिफ्टच्या भिंतीला कान नसतात. त्यामुळे आम्ही या पुढच्या आमच्या गुप्त बैठका लिफ्टमध्येच करू', अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments