Header Ads Widget

टीम इंडियाचा विजयोत्सव, पाकिस्तानवर मात

फोटो सौजन्य - www.loksatta.com

टीम इंडियाचा विजयोत्सव, पाकिस्तानवर मात

मुंबई - एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळा सुरू होता तर दुसरीकडे भारत-पाकिस्तानमध्ये सामना रंगला होता. आयसीसी टी २० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानला धूळ चारली आणि शानदार विजय मिळवला.

टीम इंडियाने पाकिस्तानवर ६ धावांनी विजय मिळवला. भारताने पाकिस्तानसमोर विजयसाठी १२० धावांचं टार्गेट ठेवलं होतं. मात्र भारताच्या गोलंदाजांनी जबरदस्त बॉलिंग करत पाकिस्तानला २० ओव्हरमध्ये १३३ धावांवर रोखलं. टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्धचा हा सातवा विजय ठरला आहे. जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तानची बॅटिंग ढेपाळत गेली. बुमराने १९व्या ओव्हरमध्ये अवघ्या तीन धावा देत १ विकेट घेतली. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये १८ धावांनी भारताने सामना जिंकला. पाकिस्तानला जिंकण्यासाठी शेवट्या ओव्हरमध्ये १८ धावांची गरज होती, मात्र  अर्शदीपने उत्तम गोलंदाजी करत अवघ्या १२ धावा दिल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान याने सर्वाधिक ३१ धावा केल्या. 

टीम इंडियाच्या गोलदाजांनी उत्तम गोलंदाजी केली. जसप्रीत बुमराहने ४ ओव्हरमध्ये १४ धावा दिल्या आणि ३ विकेट्स घेतल्या. तर हार्दिक पंड्याने दोन विकेट घेतल्या. 


 

.

Post a Comment

0 Comments