aditya thackeray : आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा
राजापूर - शिवसेना नेते तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उपनेते तथा आमदार डॉ. राजन साळवी यांच्या सूचनेनुसार तालुका शिवसेना लांजा व राजापूर तसेच युवासेनेच्या वतीने विधानसभा मतदारसंघातील लांजा व राजापूर तालुक्यामध्ये विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.
यानिमित्ताने युवासेना कॉलेज कक्ष निरीक्षक (महाराष्ट्र राज्य) अथर्व साळवी, युवासेना जिल्हा अधिकारी विनय गांगण, युवासेना रत्नागिरी जिल्हा समन्वयक दुर्गेश साळवी, युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष हातणकर, तालुका युवाधिकारी प्रसाद माने, युवती तालुका अधिकारी दीपाली दळवी-साळवी यांच्या नियोजनाखाली इयत्ता १०वी व १२वीमध्ये अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
गुरुवारी राजापूर तालुक्यामध्ये मातोश्री हॉल हा सोहळा होणार आहे. तरी सदर गुणगौरव सोहळ्यास शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिवसहकार सेना, ग्राहक संरक्षण कक्ष व सर्व अंगीकृत संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद व पंचयत समिती सदस्य, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शहरप्रमुख सर्व नगरसेवक आणि सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन युवासेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments