Header Ads Widget

Kiran samant : राजापूरच्या विकासासाठी कटिबद्ध - किरण सामंत


Kiran Samant : राजापूरच्या विकासासाठी कटिबद्ध - किरण सामंत

#kiransamannt #udaysamant #rajapur shivsena #adiwaretimes.blogspot.com

 - संदीप शेमणकर

राजापूर - राजापूर शहरातील व्यापाऱ्यांच्या  समस्या लक्षात घेऊन त्या सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू आणिव राजापूर बाजारपेठेला ऊर्जितावस्था मिळण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही  सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यानी राजापूर शहरातील व्यापारीवर्गाला दिली . किरण सामंत यांनी नुकतीच राजापूर तालुका व्यापारी संघाची भेट घेतली.

राजापूर शहराला भेडसावणाऱ्या पूररेषेबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. राजापूर शहरातील बहुतांशी भाग हा पूररेषेत येत असल्याने शहरातील इमारतींच्या बांधकामाना परवानगी मिळत नसल्याने शहराच्या विकासाला खिळ बसली असल्याची व्यथा यावेळी व्यापारीवर्गाने मांडली, तर शासनाने ही पूररेषा उठवावी यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी मागणीही यावेळी व्यापारीवर्गातुन करण्यात आली. याबाबत आपण राज्य स्तरावर  पाठपुरावा करू, असे आश्वासन किरण सामंत यांनी दिले, मात्र तोपर्यंत इमारतीच्या दुरुस्तीसाठी परवानगी मिळण्यात कोणतीच अडचण नसल्याची बाब सांगताना नागरिकांनी दुरुस्तीच्या नावावर वाढीव अथवा अनधिकृत बांधकाम करू नये, असे सांगितले. 

राजापूर शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून राजापूर शहरातील विठ्ठल मंदिर हे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. पंढरपूरप्रमाणे याही ठिकाणी अर्जुना नदीच्या पात्रात भक्त पुंडलिकाचे मंदिर आहे. त्याचे सुशोभीकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.  त्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाहीही यावेळी किरण सामंत यानी व्यापारीवर्गाला दिली. 

राजापूर शहराला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनसह मुख्य जलवाहिनीही फार जुनी झाली आहे. ती बदलण्याची आवश्यकता असल्याची बाब लक्षात आणून देताना शहरासाठी आता नव्याने पाणीपुरवठा योजना राबवण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यापाऱ्यांनी मांडले . 

राजापूर शहरातील काही भाग हा धोपेश्वर इनाममध्ये येत असुन त्या ठिकाणीही शहरवासीयांना बांधकाम  करण्यात अडचणी येत आहेत. जवळजवळ सर्वच सातबारांवर देवस्थान इनामचा शिक्का असल्याने त्या सातबारांवर बँक कर्ज आणि बांधकाम करणे नागरिकांना अडचणीचे ठरत असल्याची बाब यावेळी व्यापारीवर्गाने किरण सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली . या सर्व प्रश्नांमध्ये  जातीने लक्ष घालून सोडवण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासनही किरण सामंत यांनी व्यापारीवर्गाला दिले. 

यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक नागले, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, खजिनदार दीनानाथ कोळवणकर, उपाध्यक्ष राजेंद्र नवाळे, रमेश पोकळे, रामदास शिवदे, विजय हिवाळकर, कौशिक संसारे , शार्दुल संसारे, नितीन कुशे, प्रशांत पवार आदी व्यापारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments