Header Ads Widget

भैरी भवानीचा गोंधळ थाटामाटात संपन्न


आंगवली - रेवाळेवाडी भावकीचा भैरी भवानीचा गोंधळ थाटामाटात

- प्रमोद तरळ 

रत्नागिरी -  जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील आंगवली गावातील रेवाळे वाडी  येथे रेवाळे भावकीचा भैरी भवानी देवीचा गोंधळ नुकताच थाटामाटात संपन्न झाला. वाडीतील रेवाळे, धनावडे, गुडेकर, आग्रे, चव्हाण आणि त्यांचे नातेवाईक या गोंधळाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भैरी भवानी हे कोकणवासीयांचे एक कुलदैवत आहे. यातील भैरी (भैरव) हा शंकराचा अवतार असून त्याच्या भैरव किंवा काळभैरवनाथ या नावाचा भैरी, काळभैरी, बहिरीनाथ हे अपभ्रंश आहेत. तरी कुलदेव्हाऱ्यात भैरव व खंडोबाच्या वेगवेगळ्या मूर्ती पुजल्या जातात. भैरी भवानी (कालभैरी) देवीचे जोगेश्वरी हे एक नाव आहे. भैरी भवानी म्हणजेच कालभैरव देवाची संगिनी जोगेश्वरी आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी जिल्ह्यातील सर्वच समाजात भैरी देव हा कुलस्वामी आहे. मराठा, कोळी, आगरी, गवळी, कुणबी, न्हावी, भंडारी (राजपूत), खारवी, भोई, कराडी, सुतार, कुंभार समाजांत भैरी (भैरव) देवाला विशेष स्थान आहे. भैरी देवाची काळभैरव, काळभैरवनाथ, भैरवनाथ, बहिरीनाथ, भैरी अशी नावे असलेली अनेक मंदिरे ठाणे, रायगड व रत्‍नागिरी जिल्ह्यांत आहेत. भैरी देव हा कार्ल्याच्या एकवीरा देवीचा भाऊ मानला जातो. त्याचे मंदिर लोणावळाजवळच्या कार्ला लेणी असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या देवघर गावात आहे. आणि जोगेश्वरी देवीचे स्थान कार्ल्याच्या डोंगरावरील एकवीरेचा मंदिरात एकवीरेच्या शेजारी आहे. भैरी देव हा रक्षणकर्ता म्हणून ओळखला जातो. 

कोकणपट्टीतील सर्वच डोंगरी व सागरी किल्ल्यांवर भैरी देवाची काळभैरव,भैरवनाथ, भैरोबा,भैरी,बहिरी या नावांची स्थाने आहेत. आंगवली रेवाळे वाडी येथे पार पडलेल्या या गोंधळाचे यजमानपण यावर्षी काशिराम केशव रेवाळे, सुलोचना का. रेवाळे यांनी पार पाडले. जोगवासह सर्वं महत्वाच्या राजकोजी पूजा विधी काशिराम रेवाळे,  सुलोचना  काशिराम रेवाळे  आणि आत्माराम रामचंद्र रेवाळे मधुकर रेवाळे, विष्णू रेवाळे, दौलत रेवाळे, शिवाजी रेवाळे, सुधाकर रेवाळे, दत्ताराम रेवाळे, शांताराम सि.रेवाळे, बाळू रेवाळे, संतोष भिवा रेवाळे, अनंत लु.रेवाळे, प्रकाश रेवाळे, सचिन सावजी रेवाळे, विश्राम रेवाळे, प्रशांत रेवाळे, वकील रेवाळे, दिलीप रेवाळे,  महेश रेवाळे, संदीप तु. रेवाळे यांच्या उपस्थितीत पार पडल्या. यावेळी रुपेश रेवाळे,अंकुश रेवाळे,चेतन रेवाळे, हेमंत द.रेवाळे, काशिराम गोविंद रेवाळे,जयू रेवाळे, रामकृष्ण शंकर रेवाळे,विश्राम रेवाळे, वामन रेवाळे, शांताराम रेवाळे, कल्पेश रेवाळे, संतोष सि.रेवाळे, मंगेश वामन  रेवाळे,योगेश रेवाळे, आत्माराम ग.रेवाळे, किशोर का. रेवाळे, विकास रेवाळे, निकील आत्माराम रेवाळे, जितू आ. रेवाळे, अशोक रेवाळे, गणेश (गण्या ) दि. रेवाळे, संकेत संतोष रेवाळे, राजेंद्र शिवाजी रेवाळे, सुरेश रेवाळे,शांताराम बा. रेवाळे,वैभव रेवाळे,सुहास सुरेश रेवाळे,महेंद्र वि. रेवाळे,संदेश मधुकर रेवाळे,विनय विष्णू रेवाळे,विवेक रेवाळे आणि रेवाळे वाडी महिला मंडळ, युवा मंडळ,सर्वं तरुण -तरुणी, माहेरवाशिनी, सासरवाशिनी,जावई मंडळी आदी भावकीसह दत्ताराम ल.गुडेकर, तुकाराम ल. गुडेकर,शांताराम ल.गुडेकर बाळकृष्ण धनावडे, शशिकांत आग्रे, संतोष चव्हाण, अजित आग्रे,संदीप चव्हाण, संदीप रेवाळे उपस्थितीत होते. सर्वं पूजा विधी, जागर झाल्यावर सर्वांनी जेवण करून गोंधळी यांनी सादर केलेल्या कथेचा आनंद घेत कार्यक्रमची सांगता केली.

Post a Comment

0 Comments