Header Ads Widget

आव्हाडांंवर गुन्हा दाखल करा- भाजपा

आव्हाडांंवर गुन्हा दाखल करा- भाजपा


राजापूर - महाड येथील आंदोलनादरम्यान भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांचा फोटो फाडणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन राजापूर भाजपाच्या वतीने राजापूर पोलीस ठाण्यासह प्रांताधिकारी राजापूर यांना देण्यात आले.


दोन दिवसांपूर्वी महाड येथील चवदार तळ्याजवळ मनुस्मृती विरुद्ध आंदोलन करताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला होता. त्याबाबतचे वृत्त राज्यासह संपूर्ण देशात पसरले आणि संतापाची लाट उसळली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध ठिकठिकाणी जोरदार आंदोलने सुरू आहेत. 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी. त्यांच्यावर ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा संतप्त भावना ठिकठिकाणी व्यक्त केल्या जात आहेत. झाल्या घटनेप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जरी माफी मागितली असली तरी त्यांच्याविरुद्ध आंदोलने सुरूच आहेत.

https://abhidnyanlifeeducation.blogspot.com/2019/03/blog-post_13.html

जाहिरात 

राजापूर तालुका भाजपाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्यावर ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. गुरुवारी  सकाळी भाजपाचे समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनापाशी एकत्र जमले. त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केला. जितेंद्र आव्हाड यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणाही दिल्या गेल्या. या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, ज्येष्ठ नेते महादेव गोठणकर, मुंबईचे माजी नगरसेवक शरद कांबळे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, स्वप्नील गोठणकर, अरविंद लांजेकर, अनिल करंगुटकर, राजापूर  महिला तालुकाध्यक्ष सुयोगा जठार, महिला  पदाधिकारी शीतल पटेल यांसह भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

https://www.instagram.com/p/C7eT7V-IJrV/?igsh=MW4yYmt1dWU5cnd4OA==

जाहिरात - अमृता कलेक्शन


Post a Comment

0 Comments