परिवर्तन लढा संघटनेचा महायुतीला पाठिंबा
विरार - वसई विरार शहराच्या सर्वांगीण व चौफेर विकासाचे प्रश्न मांडत, येथील जनतेच्या मागण्या - समस्या व महत्वाचे मुद्दे यावर सामाजिक कार्यकर्ते मयुरेश वाघ यांच्या परिवर्तन लढा संघटनेने पालघर लोकसभेतील भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण , हेमंत सावरा , विद्यमान खासदार राजेंद्र गावित, तालुकाप्रमुख सुदेश चौधरी यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात मयुरेश वाघ यांनी वसई विरारच्या विकासाबाबत आपली भूमिका स्पष्ट करून भाजपा महायुतीला पाठिंबा देत असल्याचे सांगितले.
मयुरेश वाघ यांनी विरार शहराच्या विविध महत्वाच्या मागण्या मांडताना विरारच्या ग्लोबल सिटीचा विशेष उल्लेख केला. ग्लोबल सिटीच्या सर्व भागात १०० टक्के पिण्याचे पाणी पोहोचवणे व पाण्याची टाकी सुरु करणे यासह ग्लोबल सिटी भागातील समस्याही त्यांनी मांडल्या.
नालासोपारा वसई विरार मधील जनतेने २० मे रोजी भाजपला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन मयुरेश वाघ यांनी केले आहे. मते खाण्यास उभे राहिलेल्या स्थानिक पक्षाला मत देऊन मत वाया घालवू नका, असेही ते म्हणाले.
0 Comments