विशेष प्रतिनिधी
मुंबई : आडिवरे गावचे सुपुत्र आणि 'आडिवरे टाइम्स'चे संपादक संदीप शेमणकर यांना 'कोकणरत्न' मानद पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यात पुढाकार घेऊन सर्वसामान्यांना मदत करण्याऱ्या आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या संदीप शेमणकर यांना कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने सर्वच स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
राजापूर तालुक्यातील आडिवरे परिसरातील पत्रकार, दैनिक रायगड स्वाभिमान मराठी वृतपत्राचे पालघर जिल्हा संपादक, रुग्णसेवक, सामाजिक कार्यकर्ते म्हणून संदीप रामचंद्र शेमणकर यांनी मोलाची कामगिरी केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत स्वतंत्र कोकण राज्य अभियान या संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष संजय कोकरे यांच्या हस्ते संदीप रामचंद्र शेमणकर यांना "कोकणरत्न" मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
स्वतंत्र कोकणराज्य अभियानतर्फे प्रदान करण्यात आलेल्या कोकणरत्न या प्रतिष्ठित पदवीसाठी यंदा कोकणातील समाजसेवा, शिक्षण, साहित्य, कला, पत्रकारिता, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, युवक मार्गदर्शन आणि जनकल्याण या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांची निवड करण्यात आली होती. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सामाजिक प्रबोधनासाठी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
पत्रकार संदीप शेमणकर यांनी केलेले समाजकार्य, कोकणातील आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विविध संस्थांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांना केलेले शैक्षणिक साहित्यवाटप, पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवत रस्ते, एसटी डेपो, सार्वजनिक शौचालय, पूल इत्यादी कामांचा त्यांनी पाठपुरावा केला. ही विकासकामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.
हा भव्य आणि शानदार "कोकणरत्न" प्रदान सोहळा शनिवारी 13 डिसेंबर 2025 रोजी मुंबई मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न झाला. स्वतंत्र कोकणराज्य अभियानचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. त्याचबरोबर कोकणरत्न पदवीचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
पत्रकार संदीप शेमणकर यांनी कोकणरत्न पुरस्काराचे श्रेय मोगरे गावातील सहकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर सर्व हितचिंतक आणि आयोजकांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार आणि संपादक सचिन कळझुनकर उपस्थित होते. या वेळी मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे, नेते सुभाष राणे तसेच मुख्य सल्लागार दिलीप लाड, मोगरे गावातील युवा कार्यकर्ते प्रकाश चव्हाण, सुनील साखरकर, संतोष तिर्लोटकर, प्रकाश सातोपे तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित आणि मान्यवर मंडळी उपस्थित होती.
आडिवरे टाइम्स यूट्यूब चॅनेलला पाहण्यासाठी क्लिक करा
न्यूज व्हॅली यूट्यूब चॅनेल पाहण्यासाठी क्लिक करा
व्हॉट्सअॅप ग्रुपवर सामील होण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.
.jpg)

.jpeg)
0 Comments