Header Ads Widget

adivare shinde vs thackeray : आडिवऱ्यात कोण कुणाला देणार धक्का ?


adivare shinde vs thackeray :  आडिवऱ्यात कोण 
कुणाला देणार धक्का ?

आडिवरे - गेली तीन - चार दशके आडिवरे परिसरात शिवसेनेचे (शिउबाठा)चे वर्चस्व होते. पंचायत निवडणुकांपासून ते लोकसभा निवडणुकीमध्ये आडिवर परिसर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र शिवसेना फुटली आणि काही महिन्यांनंतर आडिवरे परिसरही दोन शिवसेनांमध्ये विभागला गेला. शिवसेना (शिंदेंची शिवसेना) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिउबाठा) या दोन पक्षांमध्ये आडिवरे परिसरातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी विभागले गेले. 


राजापूर - लांजा - साखरपा विधानसभा मतदारसंघात शिउबाठाचे वर्चस्व होते. या मतदारसंघात आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाटचाल सुरू होती. मात्र शिवसेनेत फुट पडल्यानंतर आडिवरे परिसरातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत गेले. शिवसेनेचे पदाधिकारी दीपक नागले यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिंदेंच्या शिवसेनेत दीपक नागले यांच्यावर तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. आता ऐन विधानसभा निवडणुकीत आडिवरे परिसरासह राजापूर तालुक्यातील अनेक शिवसैनिकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. तर काही वाड्यांमधील ग्रामस्थ ठाकरेंच्य शिवसेनेला पंसती देत आहेत. असे असले तरी आडिवरे परिसरात ठाकरेंच्याच शिवसेनेची हवा असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. त्यातच काँग्रेसकडून अविनाश लाड निवडणूक रिंगणात उतरण्याची चर्चा आहे. मविआ एकत्रित निवडणूक लढवणार असल्याने राजापूर - लांजा - साखरपा मतदारसंघ काँग्रेसला सोडणार की ठाकरेंच्या शिवसेनेला सोडणार, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.


आडिवरे परिसरातील अनेक वाड्यांमधील कार्यकर्ते हे शिंदेंच्या शिवसेनेचे किरण सामंत आणि दीपक नागले यांच्यावर विश्वास ठेवून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आडिवरे परिसरासह राजापूर - लांजा - साखरपा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेसमोर शिंदेंच्या शिवसेनेने आव्हान दिल्याची चर्चा रंगली आहे. असे असले तरी विधानसभा निवडणुकीत आडिवरे परिसरातून ठाकरेंच्या शिवसेनेला जास्त पसंती असल्याची चर्चाही रंगली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कोण कुणाला धक्का देणार, हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. 


Post a Comment

0 Comments