Success Story : २५० रुपये पगाराच्या नोकरीपासून ते फॅशन प्रॉडक्शन हाऊस सुरू करण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
Success Story: आर्थिक परिस्थितीतून आपल्या कुटुंबाला बाहेर काढण्याची सीड यांची इच्छा होती. मग ते ऑफिस बॉयची नोकरी सोडून एका कॉफी हाऊसमध्ये वेटर म्हणून काम करू लागले. नंतर त्यांनी बंगळुरूमधील एका मॉलमध्ये रिटेल स्टोअरमध्ये नोकरी मिळवली.
Success Story: प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात आपली स्वप्ने पूर्ण करण्याची इच्छा असते. पण, बऱ्याचदा घरातील जबाबदाऱ्यांमुळे कित्येकांना स्वप्नपूर्ती करणे शक्य होत नाही. पण, असेही काही लोक असतात की, जे सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करूनही स्वत:च्या स्वप्नालाही गवसणी घालतात. भारतात अशा अनेक उद्योजक, विविध क्षेत्रांतील दिग्गज, अधिकाऱ्यांची उदाहरणे आहेत की, ज्यांनी कुटुंबाच्या जबाबदारीबरोबरच आपले स्वप्नदेखील पूर्ण केले आहे. सीड नायडू यांची यशोगाथादेखील अशीच प्रेरणादायी आहे.
२००७ मध्ये सीड नायडू यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी सीड यांच्या आईवर आली. केवळ १,५०० रुपयांच्या मासिक पगारात त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत होता. आर्थिक चणचण कमी करण्यासाठी सीडने वर्तमानपत्र विकण्यास सुरुवात केली. वृत्तपत्र विक्रेता म्हणून त्यांना दरमहा २५० रुपये मिळायचे. या आर्थिक परिस्थितीमुळे सीड उच्च शिक्षण घेऊ शकत नव्हते. त्यांनी दहावी पूर्ण केल्यानंतर ऑफिस बॉयची ३,००० पगाराची नोकरी करायचं ठरवलं.
जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
या आर्थिक परिस्थितीतून आपल्या कुटुंबाला बाहेर काढण्याची सीड यांची इच्छा होती. मग ते ऑफिस बॉयची नोकरी सोडून एका कॉफी हाऊसमध्ये वेटर म्हणून काम करू लागले. नंतर त्यांनी बंगळुरूमधील एका मॉलमध्ये रिटेल स्टोअरमध्ये नोकरी मिळवली. तिथे त्यांनी मार्केटिंग आणि ऑपरेशन्स टीममधील लोकांशी मैत्री करायला सुरुवात केली. त्यानंतर तिथल्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या एका व्यक्तीशी त्यांची चांगली मैत्री झाली. कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या व्यक्तीने जेव्हा नोकरी सोडली तेव्हा त्यांनी सीड नायडू यांना त्याची जागा घेण्यास सांगितले. त्यानंतर सीड त्या नोकरीत सामील झाले आणि इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातील लोकांसोबत काम करू लागले; ज्यामुळे त्यांना फॅशन प्रॉडक्शन हाऊस उघडण्यास खूप मदत झाली.
फॅशन इंडस्ट्रीमध्ये यश
फॅशन आणि इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातील दृढनिश्चय आणि सतत वाढत जाणाऱ्या नेटवर्कसह सीड यांनी आपल्या कौशल्य आणि आत्मसात केलेल्या ज्ञानाचा उपयोग करून घेतला. सीड यांनी फॅशन उद्योगात आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. त्यांची चिकाटी, मेहनत आणि उद्योजकतेचा पुरावा म्हणून सीड नायडू यांचा प्रवास अनेकांसाठी खूप प्रेरणादायी आहे. source - www.loksatta.com
0 Comments