Header Ads Widget

rajan salvi : आमदार राजन साळवींकडून व्यापाऱ्यांची विचारपूस


rajan salvi : आमदार राजन साळवींकडून व्यापाऱ्यांची विचारपूस

संदीप शेमणकर 

राजापूर - मागील दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण कोकणात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना नदीचे पाणी राजापूर शहरात भरले असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनी राजापूर बाजारपेठेला भेट दिली. राजन साळवी यांनी बाजारपेठेला भेट देऊन पूरस्थितीची पाहणी करून व्यापाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांना दिलासा दिला. 

या भेटीदरम्यान राजन साळवी यांनी राजापुरातील व्यापाऱ्यांची आपुलकीने विचारपूस केली. वाढदिवस असतानाही त्यांनी राजापुरात जाऊन व्यापाऱ्यांची भेट घेऊन चौकशी केल्यामुळे व्यापारीवर्गाने आनंद व्यक्त केला आहे. 


Post a Comment

0 Comments