konkan rain : पूल पडला, संपर्क तुटला
नितेश तिवरमकर
नाटे - कोकणात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. राजापूर तालुक्यातील अनेक गावांमधील ओढ्यांना पाणी आले आहे. नाटे येथील नाटे ते ठाकरे वाडी यांना जोडणारा पूल पडला आहे. त्यामुळे या दोन गावांचा संपर्क तुटला आहे.
राजापूर तालुक्यातील नाटे येथे दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. नाट्यातील पऱ्यांना पाणी आले आहे. मुसळधार पावसामुळे नाटे ते ठाकरे वाडी यांना जोडणारा पूल तुटल्यामुळे या दोन्ही गावांचा संपर्कही तुटला आहे. या घटनेची माहिती मिळताच राजापूरच्या तहसीलदार यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि पाहणी केली. यावेळी नाटे गावचे सरपंच संदीप बांदकर आणि ग्रामस्थांनी पाहणी केली.
0 Comments