runde - संज्ञा बंडबेची यशस्वी भरारी
प्रतिनिधी
मुंबई - आडिवरे परिसरातील रुंढेगावची कन्या संज्ञा सुनील बंडबे हिने मेहनत आणि परिश्रमाच्या जोरावर यशस्वी भरारी घेतली आहे. तिच्या कामाची दखल घेत तिची आता रायगड जिल्ह्याच्या वनविभागात अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.
संज्ञा बंडबे हिची वनविभागात नियुक्ती झाल्यानंतर सर्वच स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. संज्ञा हिने रुंढे गावाचे नाव उज्ज्वल केले अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
0 Comments