“हिंदू-मुस्लीम लग्न करू शकत नाहीत का?” सोनाक्षी-
झहीरच्या लग्नावर मुकेश खन्नांची प्रतिक्रिया; म्हणाले,
“लव्ह जिहाद…”
मुकेश खन्ना म्हणाले, “लव्ह जिहाद कशाला म्हणतात जेव्हा मुलीला लग्नासाठी जबरदस्ती केली जाते. हिंदू-मुस्लीम लग्न करू शकत नाहीत का? आमच्या काळातही अनेकांची अशीच लग्नं झाली होती आणि ते सगळे लोक खूप आनंदी आहेत. सोनाक्षी व झहीरचं लग्न ही त्यांच्या कुटुंबीयांसाठी अतिशय कौटुंबिक बाब आहे.”
सोनाक्षी व झहीरच्या लग्नाबाबत कुटुंबीय नाराज आहेत अशा चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी खामोश म्हणत नकारात्मक प्रतिक्रिया देणाऱ्यांना गप्प केलं होतं. “या क्षणाची प्रत्येक मुलीचे वडील आतुरतेने वाट पाहत असतात. माझी मुलगी झहीरबरोबर सर्वाधिक आनंदी आहे त्यामुळे ते दोघंही कायम आनंदी आणि सुखात राहोत” असंही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते.
दरम्यान, सोनाक्षी आणि झहीरसाठी २३ जून हा दिवस खूपच आहे. यामागचं कारण म्हणजे दोघांच्याही आयुष्यात या दिवसाला प्रचंड महत्त्व आहे. २०१७ मध्ये याच दिवशी ते एकत्र आले होते अन् त्यानंतर बरोबर सात वर्षांनी म्हणजेच २३ जून २०२४ रोजी हे जोडपं लग्नबंधनात अडकलं. अभिनेत्रीने लग्नात आईची साडी नेसून तिचेच दागिने घालून पारंपरिक लूक केला होता. तर रिसेप्शन पार्टीला लाल साडी, केसात गजरा, भांगेत कुंकू या लूकमध्ये सोनाक्षी खूपच सुंदर दिसत होती. source - www.loksatta.com
0 Comments