Header Ads Widget

kasheli grampanchayt_bjp : कशेळी ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात


कशेळी ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात

सोनाली मेस्त्रींच्या राजीनाम्यानंतर दीप्ती हळदणकरांची बिनविरोध निवड

- संदीप शेमणकर

आडिवरे - कशेळी ग्रामपंचायतीमध्ये सत्तापरिवर्तन झाले असून ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात गेली आहे. नुकत्याच पार पडलेल्या कशेळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या दीप्ती हळदणकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या सरपंच सोनाली मेस्त्री यांनी सरपंचपदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी शुक्रवारी पोटनिवडणूक घेण्यात आली.

यावेळी ओबीसी स्त्री राखीव सरपंचपदासाठी भाजपाकडून दीप्ती हळदणकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार दीपाली पंडित यांनी दीप्ती हळदणकर यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

खास सुट, करा लयलूट

कशेळी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाला ४, ठाकरेंच्या शिवसेनेला ४ आणि काँग्रेसला १ जागेवर विजय मिळाला होता. त्यावेळी काँग्रेसने ठाकरेंच्या शिवसेनेला साथ दिल्याने सरपंचपदी सोनाली मेस्त्री तर उपसरपंचपदी नंदकुमार फोडकर यांची निवड झाली होती.          

आता सोनाली मेस्त्री यांनी सदस्याचाच राजीनामा दिल्याने एक जागा रिक्त राहिली. उर्वरित ८ सदस्यांमध्ये सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी भाजपाकडून दीप्ती हळदणकर यांनी सरपंचपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांची बिनविरोध निवड झाली.

हेही वाचा....

यावेळी उपसरपंच नंदकुमार फोडकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश डुकळे, अनंत फणसे, सीमा गोठणकर, पल्लवी सावरे, समीक्षा राडये तसेच माजी सरपंच दीपक हळदणकर, दिवाकर फोडकर, ग्रामसेविका लिंगायत आदी उपस्थित होते. 

तुम्हाला नक्की आवडेल

भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, पदाधिकारी वसंत पाटील, भिकाजी फोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच दीप्ती हळदणकर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर भाजपाच्या महिला प्रदेश सरचिटणीस शिल्पा मराठे, तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, अमोल सिनकर आदींनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

लेडिज स्पेशल

सोनाली मेस्त्रींच्या राजीनाम्याची चर्चा

सोनाली मेस्त्री यांनी राजीनामा दिल्यानंतर कशेळीसह आजूबाजूच्या परिसरात चर्चांना उधाण आले. सोनाली यांनी राजीनामा का दिला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. त्यांच्यावर राजीनामा देण्याबाबत दबाव होता की अन्य कोणत्या कारणांनी त्यांनी राजीनामा दिला हे विचारण्यासाठी 'आडिवरे टाइम्स'ने त्यांच्याकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. 

Post a Comment

0 Comments