जनसेवेचा अखंड ध्यास घेतलेला अवलिया संदीप शेमणकर
प्रमोद तरळ
घरची अत्यंत बिकट आर्थिक परिस्थिती परंतु मनाची श्रीमंती सतत दुसऱ्यांसाठी काही ना काही तर करण्याची धडपड करणाऱ्या संदीप शेमणकर यांच्या अजातशत्रू व्यक्तिमत्त्व संदीप शेमणकर या अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाच्या जीवनातील खडतर प्रवास !
राजापूर तालुक्यातील आडिवरे परिसरातील मोगरे गावातील शेमणकर वाडी मधील एक सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेले एक व्यक्तिमत्त्व म्हणजे संदीप रामचंद्र शेमणकर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा मोगरे येथे शिक्षण घेत आडिवरे येथे पुढील शिक्षणासाठी गेल्यावर कठीण परिस्थिती शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी मुंबई येथे वास्तव्यास आलेला एक तरुण युवक स्वप्न उराशी बाळगून पुढील शिक्षण इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा करत, नोकरी करत, पूर्ण केले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांचा मावळा,शाहू फुले, आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारधारेचा पाईक, पत्रकार क्षेत्रात अग्रेसर असलेले 'सत्याची धार, लेखणीचा वार' करत सामाजिक प्रश्नावर आवाज उठवणारे व्यक्तिमत्व, त्या प्रश्नाचा पाठपुरावा करत मार्गी लावण्यासाठी सतत झटत राहणं असा अंगी बाणा दाखवत सडेतोड लेखणीतून जवाब देऊन काम मार्गी लावणे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत जनमानसात आपली ओळख निर्माण केलेले व्यक्तिमत्व, गाव ते मुंबई, प्रत्येक जिल्ह्यात जनसंपर्क, प्रत्येक, राजकीय पक्षात जनसंपर्क, शासकीय कामाचा जनसंपर्क, आरोग्य सेवेचा जनसंपर्क, शासकीय पत्र व्यवहाराचा जनसंपर्क, आरोग्य सेवेत भरीव योगदान देणारे, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी न चुकता किमान प्रत्येक महिन्यात ५ व्यक्तींचे मोतीबिंदू ऑपरेशन मोफत करून देत गरिबांच्या हाकेला धावणारा आरोग्य मित्र, रात्री उशिरापर्यंत कधीही संपर्कात आणि मदतीसाठी धावून येणारे एका फोन वर समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द असणारे व्यक्तिमत्त्व, वेळेला रुग्ण याच्याकडे नातेवाईक नसताना मोठी अडचण येते तरी सुद्धा आपल्या खिशातील पदर मोड करत ब्लड स्वतः घेऊन येणे इथपर्यंत काम करणारे असे व्यक्तिमत्व, कोणत्याही प्रकारे आरोग्य सेवेत रुग्णाला मदत मिळण्यासाठी नेहमी शासकीय योजनांचा महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ घेऊन कित्येक रुग्णांची मोफत सर्जरी करून दिलेले एक व्यक्तिमत्व, मदतीचा हात मागताच हो म्हणून कामाला लागणार असे व्यक्तिमत्व, मुंबई ते गाव प्रत्येक व्यक्तीशी कनेक्ट असणारे सदा हसत आपला चेहरा आनंदी ठेवत, कतीही संकटे आली तरी न डगमगता प्रत्येक युवकाच्या मागे खंभीर उभे राहत त्याला योग्य मार्गदर्शन करत त्याच्या ध्येयाच्या दिशेने वाटचालीसाठी शुभेच्छा देत मनोबल वाढवण्याचे कार्य करणारे व्यक्तिमत्व,सामाजिक संस्था, यांच्याशी जनसंपर्क ठेवत लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्याचा उपयोग करून घेणारे व्यक्तिमत्व झोपडी बचाव परिषद सारख्या संघटनेत प्रमुख कार्यवाहक म्हणून कामकाज पाहत असताना दिल्ली येथे आंदोलनात सहभागी असताना साडेतीन दिवस अटक होऊनसुद्धा न डगमगता दिल्लीच्या तख्ताशी झुंज देणारा मावळा सामाजिक कार्यकर्ता, कोण काय बोलते, बोलेल याकडे दुर्लक्ष करत नेहमी प्रामाणिक मदत करत दुसऱ्याचा विचार करून त्याला योग्य मदत करून संकटाच्या वेळी मार्ग दाखवणारा असा सामाजिक कार्यकर्ता अशा कार्यकर्त्याचा आज वाढदिवस पत्रकार संपादक सामाजिक कार्यकर्ता,आरोग्य मित्र अशी ओळख असलेले आमचे स्नेही संदीप रामचंद्र शेमणकर यांच्या जन्मदिवसा निमित्त रत्नागिरी जिल्ह्यासह रायगड, सिंधुदुर्ग तसेच मुबईतूनही त्यांच्यावर शुभेच्छा वर्षाव होत आहे
0 Comments