vinayak raut : विनायक राऊतांनी मानले कार्यकर्त्यांचे आभार
संदीप शेमणकर
राजापूर - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील राजापूर तालुक्यातील जनतेने शिवसेना नेते विनायक राऊत यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी राजापूर तालुक्यातील इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्री सभागृह येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. राजापूर तालुक्यातील इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामांमुळे तालुक्यात मिळालेल्या मताधिक्याबदल सर्वांचे आभार मानतो, असे विनायक राऊत यांनी सांगितले. त्यावेशी जिल्हा संपर्कप्रमुख, उपनेते अरुभाई दुधवडकर, लोकसभा संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, काँग्रेस पक्ष राज्य कार्यकारिणी सदस्य तथा माजी आमदार हुस्नबानू खलिफे, लोकसभा महिला आघाडी नेहा माने, काँग्रेसचे नेते रमेश किर, जिल्हा अध्यक्ष अविनाश लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे आबा आडिवरेकर, जिल्हाप्रमुख विलास चाळके आणि तालुक्यातील इंडिया आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments