sharad nawale : झुंजार तरुणांच्या संघर्षाची थक्क करणारी कहाणी
लढाई ही प्रकाशित झालेली बेस्ट सेलर कादंबरी..
आणि म्हणूनच
अतिशय ताकदीचे लिखाण करणारा पुरुष लेखक म्हणजेच,
श्री.शरद यशवंत नवाळे
माहेरची साडी नावाचा चित्रपट आला त्यावेळी गावखेड्यातल्या स्रीया त्या चित्रपटात अलका कुबलचा होणारा छळ बघून हमसून हमसून रडत होत्या...
पण,
तो छळ बघून रडत होत्या हे अर्धसत्य आहे...
खरं तर त्या जे ' जगत ' होत्या तेच ' बघत ' होत्या
आणि
म्हणूनच हुंदका फुटत होता.
पण,
माहेरची साडी हा केवळ ट्रेलर होता गावखेड्यातल्या तरुणांची संघर्षाची वेब सिरीज खऱ्या अर्थानं समजून घ्यायची असेल तर ....
श्री शरद यशवंत नवाळे, लिखित
"लढाई"
अवश्य भेट द्या, पावसाळा आला, पाणी सांभाळा
ही महाकांदबरी वाचायलाच पाहिजे असं मला ठामपणे वाटतं...
ही कांदबरी,
तो तरुण दुबळा, गरीब होता. या संकल्पनेला छेद देऊन त्याच्या खमक्या जगण्याची गाथा समर्थपणे मांडतात.
ही कादंबरी त्याच्या त्यागाची टोकाची अवहेलना होत असतानाही तो चालत राहिलेल्या असंख्य तरुणांचं प्रतिनिधित्व करतो.
परिस्थिती आणि बुरसटलेल्या रुढी पंरपरेने त्याच्या नशिबी संघर्ष आणि वेदना भरली पण,
तो अजिबात हरला नाही,
डगमगला नाही
उलट संकटांच्या विरोधात तो पाय रोवून उभा राहीला...
प्रत्येक पान वाचताना असं वाटतं होतं की आता हा आत्महत्या करेलच पण तो लढतच राहतो लढतच राहतो.
असं एकही पान नाही ज्या पानावर डोळ्यातून ओघळणारे अश्रू पुस्तकाच्या पानांवर पडत नाहीत.
डोळे कोरडे ठेवून ही गोष्ट वाचताच येऊ शकत नाही. एक वेळ तर अशी येते की नको आता वाचायला. पण नाही राहवत त्या नायकात जीव एवढा गुंतून राहतो की माणूस वाचतच राहतो.
एकवेळ, गावखेड्यातल्या बाईच्या बांळतपणानंतर तिला कडकडीत पाण्याची आंघोळ मिळाली नसेल,
पण डोळ्यातल्या गरम पाण्याच्या आंघोळीचा अभिषेक कधी चुकला नाही.
तो रडला, ओरडला... उपाशी राहिला... अनेक रात्री जागा राहिला... मार सहन करत राहिला... शेती मातीशी, गुराढोरांशी बोलत राहिला...
पण,
या सगळ्या वादळात चांगुलपणाची पणती मात्र विझू त्याने दिली नाही.
तो संघर्षाच्या टोकावरुन... खंबीरपणाच्या टोकापर्यंतच्या प्रवासात मानवतेचा पुल बनून दुखाःचं ओझं पेलतं राहीला..
या कांदबरीचा नायक कोण आहे...?
तर मी एवढच सांगेन की
कांदबरी वाचणाऱ्या प्रत्येकाच्या घरात नात्यात ती सहजपणे सापडेल.
कांदबरी वाचताना मुळ नायक तुम्ही सहजपणे विसरुन जाल आणि तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या तरुणांच्या जगण्याशी,त्याच्या वेदनेशी, अतिव दुखाःशी जोडले जाल.
तुम्हाला भास होईल माती,चुल,शेत शिवार तुमच्याशी बोलत असल्याचा.
या कांदबरीने मराठी साहित्याला शरद यशवंत नवाळे यांच्या रुपाने तरुण वादी पुरुष लेखक देखील दिला आहे.हा नवा पायंडा सुरु झाल्याचा आनंद आहे...
म्हणून तर ही अफाट वेब सिरीज वाचायलाचं हवी... मला माहितीय की वेबसिरीज वाचली जात नाही,
पाहीली जाते...पण, ही येणारी कांदबरी वाचत' असताना ती तुम्हाला
' पाहताही ' येईल... प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहील एवढ्या ताकदीची भाषा ह्यात आहे. तुफान प्रवाही गोष्ट. कथानक. ग्रामीण भाषेचा अफलातून लहेजा ह्यात वाचायला मिळतो.
(या कांदबरीतील काही प्रसंग जगलेला माझा मित्र
"लढाई"
ऐकून भावनाविवश झाला आहे.
मी त्याला वाचून दाखवत होतो अन् तो पुन्हा भूतकाळात जाऊन माघारी येताना ओला होत होता.
डोळे पुसत पुसत मीही वाचत होतो अन् तो ही श्वास रोखून डोळ्याला रुमाल लावून ऐकत होता.
काही काही प्रसंगात माझा मित्रचं मला कादंबरीतील पात्र वाटत होता एवढ्या ताकदीने ह्यातले प्रसंग लेखक श्री शरद यशवंत नवाळे यांनी मांडले आहेत. )
असो,
काही दिवसातच ही कादंबरी आपल्या भेटीला येत आहे अन् ही मराठी साहित्याला समृध्द करणारी गोष्ट आहे. कारण
मराठी सामजिक पुस्तकांना फार कमी मागणी असते असे काही काळ झाले होते पण
"लढाई"
निमित्ताने हा गैरसमज खोडून काढण्यात आलेला आहे.
ह्या कादंबरीच्या शेकडो आवृत्त्या निघतीलच ह्यात शंका नाहीच
देवा झिंजाड ( BA,MBA,DE,ITI.)
कवी, लेखक,साहित्यिक
१) 'झी मराठी' हास्यसम्राट ह्या मालिकेत सहभाग
२) 'झी २४ तास' चॅनेलवर कविता सादरीकरण
३) 'जय महाराष्ट्र' चॅनेलवर कविता सादरीकरण

0 Comments