konkan ranmeva : कोकणातील रानमेव्याची परदेशवारी
छाया भिडे यांचा पुढाकार, रोजगार उपलब्ध
संदीप शेमणकर
देवरुख - कोकणातील रानमेवा समजल्या जाणाऱ्या जांभूळ या फळाला परदेशवारी घडवली आहे ती छाया उदय भिडे यांनी. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख या गावातील छाया भिडे यांनी या जांभळाना फक्त परदेशवारीच घडवली नाही, तर स्थानिकांना रोजगारदेखील उपलब्ध करून दिला आहे. छाया भिडे या जांभूळ या फळाची पोळी तयार करून बाजारपेठेत विकतात.
पूर्णतः नैसर्गिक असलेली ही जांभूळपोळी भारतातील अनेक राज्यात विक्रीकरिता पाठवण्यात येते. शिवाय तिने ऑस्ट्रेलियाची वारीदेखील केली आहे. या जांभूळपोळीला सध्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मधुमेह या रोगावर अतिशय गुणकारी असलेल्या या जांभूळपोळीला देशभरातून मागणी आहे.
![]() |
| advt - https://amzn.to/3z4fnBO |
खास सूट, करा लयलूट
२५ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या व्यवसायाच्या इतिहासाबद्दल
जांभूळ फळ हे खरंच मधुमेहावर गुणकारी आहे. जांभूळ हे फळ हंगामी असल्याने त्यावर संशोधन करुन, वेगवेगळे प्रयोग करुन जांभूळपोळीची निर्मिती केली, जी बारमाही टिकू शकते. कधी कधी जांभळांचे प्रमाण कमी असते, कधी जास्त असते, तसेच ती उन्हात सुकवण्यात येत असल्याने हवामानावरदेखील अवलंबून राहावे लागते, भिडे यांची ही सुमधुर जांभूळपोळी संपूर्णतः नैसर्गिक आहे. ती टिकवण्यासाठी तिच्यात कोणत्याही कृत्रिम पदार्थाचा वापर करण्यात येत नाही. तसेच जांभूळ सुकवण्यासाठीदेखील ड्रायर यंत्राचा वापर केला जात नाही. सूर्यप्रकाशातच ती वाळवण्यात येतात.
छाया भिडे यांच्या या व्यवसायामुळे कोकणातील या रानमेव्याला चांगला दर मिळू लागला आहे. पूर्वी अल्पदर मिळत असलेल्या जांभळांना आता भिडे कुटुंबीय २० ते २२ रुपये प्रतिकिलोने विकत घेतात. त्याशिवाय भिडे यांच्या या उद्योगामुळे गावातील अनेक लोकांना रोजगाराची संधीदेखील मिळाली आहे. हवाबंद पॅक केल्याने ही जांभूळपोळी वर्षभर टिकते.
![]() |
| advt - https://amzn.to/4emlIIV |
विद्यार्थ्यांसाठी खास भेट
सुरुवातीच्या काळात त्या स्वतःच जांभुळपोळी तयार करत होत्या. गावातील जांभळे गोळा करून, ती स्वच्छ करुन त्याचा रस काढून ते पोळी तयार करुन सुकवेपर्यंत सर्व कामे माणसांद्वारे केली जात असत. सुरुवातीच्या काळात तर जांभळांचा रस मिक्सरवर काढण्यात येत होता, त्यामुळे या कामाला वेळ फार लागत असे. कालांतराने आम्ही एक यंत्र तयार करून घेतले, ज्यावर जांभळांचा रस काढता येत होता आणि त्याची पोळी तयार करू लागलो, असे छाया भिडे यांनी सांगितले. सध्या ते देवरुख गावासोबतच शेजारील गावांमधील जांभळेदेखील विकत घेतात.



0 Comments