![]() |
deepak nagale : दांडे-अणसुरे पूल पंधरा दिवसात वाहतुकीस खुला होणार
शिवसेना तालुकाप्रमुख दीपक नागले यांची माहिती
संदीप शेमणकर
राजापूर - सागरी महामार्गावरील सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा राजापूर तालुक्यातील दांडे-अणसुरे पुलाच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाचे रखडलेले काम लवकरात लवकर मार्गी लागावे आणि होणारी जनतेची गैरसोय दूर व्हावी यासाठी सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती. सध्या युद्धपातळीवर काम सुरू असून येत्या पंधरा दिवसात हे काम पूर्ण होईल आणि हा पूल वाहतुकीस खुला करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक नागले यांनी दिली.
![]() |
| advt |
भारी सूट, करा लयलूट
दांडे-अणसुरे पुलाच्या दुरुस्ती कामाच्या ठिकाणी दीपक नागले यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. या पावसाळ्यात या पुलावरून सुरळीत वाहतूक सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, हे काम वेळीच पूर्ण व्हावे यासाठी सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पाठपुरावा करत होतो. आता हे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या पंधरा दिवसात हा पूल वाहतुकीस खुला होईल, असा विश्वास नागले यांनी व्यक्त केला. त्यामुळे जनतेची होणारी गैरसोय दूर होणार असल्याचे नागले यांनी सांगितले.
सागरी महामार्गावरील सिंधुदुर्ग-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा राजापूर तालुक्यातील दांडे-अणसुरे पुलाच्या दुरूस्तीचे काम गेले वर्षभर अत्यंत संथ गतीने सुरू आहे. सदरचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊन वाहतुक सुरू होईल असा दावा प्रशासनाने केला होता. मात्र अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे लवकरात लवकर हे काम मार्गी लावण्याच्या दृष्टीने किरण सामंत यांनी प्रशासनाला सूचना केल्या होत्या. तर पुलाअभावी स्थानिक जनतेची होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी किरण सामंत यांनी पर्यायी व्यवस्था केली होती.
सागरी महामार्गावरील सिंधुदुर्ग-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा राजापूर तालुक्यातील दांडे-अणसुरे पूल बांधल्यापासून सुमारे पाच वर्षातच नादुरुस्त झाला होता. दांडे अणसुरे बाजूकडील पुलाचा काही भाग खचल्यामुळे तो धोकादायक झाला होता. त्यामुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करून दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या पुलाच्या दुरुस्तीचे काम १० कोटी रुपये खर्चुन घारपुरे कन्स्ट्रक्शन ही कंपनी करीत आहेत. मूळ पुलाच्या जागी असलेला भराव हटवून १ पीलर वाढवून पुलाची लांबी वाढविली आहे. यासाठी अपेक्षित कालावधी तीन महिन्यांचा असताना आता वर्षभराचा कालावधी लोटला तरी पुल वाहतुकीसाठी सुरू न झाल्याने दोन्हीही जिल्ह्यातील वाहनचालक व जनतेला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले.
आता हे काम अंतिम टप्प्यात आले असून पावसाळ्यात हा पूल वाहतुकीस खुला होऊन होणारी गैरसोय दूर होणार असल्याचे नागले यांनी सांगितले. आपण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमेवत नुकतीच या कामाची पाहणी केली. याप्रसंगी स्थानिक ग्रामस्थ रमेश काजवे, महिला उपतालुकाप्रमुख सिद्धी शिरसेकर, शाखाप्रमुख संदीप कदम, संतोष लिंगायत, संतोष जैतापकर, अमोल कांबळी, राहुल आंबोळकर आदी उपस्थित होते.




0 Comments