Indian Navy Bharti 2024 : भारतीय नौदलामध्ये नोकरीची संधी!
स्पोर्ट्स कोट्यांतर्गत होणार भरती, २० जुलैपूर्वी करा अर्ज
Indian Navy Bharti 2024 : भारतीय नौदलाने इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे “स्पोर्ट्स कोटयांतर्गत ही भरती होणार आहे. या मोहिमेंतर्गच विविध पदांची भरती होणार आहे. अर्ज ऑफलाइन करायचा आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय नौदलाच्या रिक्त पदासाठी २०२४ साठी अंतिम तारखेपूर्वी दिलेल्या नमूद पत्त्यावर त्यांचे अर्ज जमा करू शकतात. अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख २० जुलै २०२४ आहे. भारतीय नौदल SSC अधिकारी भरती २०२४ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या http://www.MahaBharti.in वेबसाइटला भेट द्या.
Indian Navy Bharti 2024 – वयोमर्यादा
भारतीय नौदलामध्ये क्रीडा कोट्याच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छूक उमेदाराची वयोमर्यादा २५ वर्षे आहे.Indian Navy Bharti 2024 – शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून १०+२ उतीर्ण असावा किंवा समतुल्य परीक्षा उतीर्ण असावा.
Indian Navy Bharti 2024 अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/
Indian Navy Bharti 2024 – अधिसुचना – https://www.joinindiannavy.gov.in/files/Sports_Quota_Adv.pdf
Indian Navy Bharti 2024 वेतनश्रेणी (Salary Details For Indian Navy Application 2024)
सुरुवातीच्या प्रशिक्षण कालावधीत, दरमहा १४,६००/- स्टायपेंड मिळेल. सुरुवातीचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर, त्यांना पेटी ऑफिसरसाठी वेतन स्तर ५ आणि चिफ पेटी ऑफिसर वेतन स्तर ६ मध्ये ठेवण्यात येईल. याशिवाय, त्यांना MSP @ ५२००/- प्रति महिना अधिक DA (लागू असेल) दिले जाईल.
Indian Navy Bharti 2024 – अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, भारतीय नौदल क्रीडा नियंत्रण मंडळ, नौदल मुख्यालय, संरक्षण मंत्रालय, सातवा मजला, चाणक्य भवन, चाणक्य पुरी, नवी दिल्ली ११००२१
अर्जाबरोबर संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
source - www.loksatta.com
0 Comments