४ जूननंतर रत्नागिरी जिल्ह्याचे राजकारण बदलणार
आशेचा किरण दिसणार की नवीन उदयास येणार?
रत्नागिरी - ४ जूननंतर रत्नागिरी जिल्ह्याचे राजकारण बदलणार, जिल्ह्याला आशेचा किरण दिसणार तर कोणाचा तरी उदय होणार? ४ जूनच्या नंतरच्या निकालानंतर निकालातच रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणाचे चित्र पालटणार आहे. काहींच्या मते पराभवाचे उट्टे काढले जाईल. तर काहींच्या मते नारायण राणे निवडून आले तर मग सिंधुदुर्गप्रमाणे राणेपर्व रत्नागिरी जिल्ह्यातील सुरू होईल. तर काहींच्या मते, राणे पडले तर राणेंच्या पराभवाला कोण कोण जबाबदार आणि कशा घटना घडल्या त्याची क्रमवारी लावली जाणार? निवडणुकीच्या अगोदर रेल्वेच्या गाडीतून येताना कोणाची सेटिंग झाली? तुम्ही खासदार आम्ही आमदार तर काहींच्या मते हॉटेलमध्ये शेजारीशेजारी घेतलेले रूम राजकारणाची राजकीय गणित पालटणार का? अशीही चर्चा रंगलीय.
जाहिरात |
https://abhidnyanlifeeducation.blogspot.com/2019/03/blog-post_13.html
एकंदरीत ४ जूनच्या लोकसभेचा निकाल हा रत्नागिरीकरांसाठी देशापेक्षा, राज्यापेक्षा फारच लय आणि ताल याच्यावर अवलंबून राहणार असल्याचे दिसत आहे. ४ जूनच्या निकालानंतर सगळे स्पष्ट होणार असून एकमेकांवर पराभवाचे खापरही फोडले जाईल. आणि मग तेरी भी चूप मेरी भी चूप असंच काही राहणार असल्याचे बोलले जाते.
४ जूननंतर कोण बनेगा खासदार त्याऐवजी कोण बनेगा राजकारणी ठरवले जाणार असल्याचे दिसते.
0 Comments