Header Ads Widget

नूतन विद्यामंदिर ओणीची उज्ज्वल परंपरा, दहावीचा निकाल 100 टक्के


नूतन विद्यामंदिर ओणीची उज्ज्वल परंपरा, दहावीचा निकाल 100 टक्के

राजापूर - राजापूर तालुक्यातील ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचालित नूतन विद्यामंदिर ओणीचा माध्यमिक शाळांत परीक्षा मार्च 2024चा निकाल हा 100 टक्के लागला आहे. नूतन विद्यामंदिर ही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय ओणी पंचक्रोशीतील नामांकित असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. 

नूतन ओणी विद्यामंदिरातून कु. पराग प्रशांत गोरुले याने 93 टक्के मार्क मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तर कु. रिया दिलीप गुरव हिने 92.40 टक्के मार्क मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच कु. सिद्धी विजय चव्हाण हिने 91.20 टक्के मार्क मिळवून तृतीय क्रमांक पटकवला आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष वासुदेव तुळसणकर, कार्याध्यक्ष प्रदीप संसारे तसेच संस्था संचालक, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक. कर्मचारी यांनी केले.

Post a Comment

0 Comments