काहीही म्हणा...मोदीच घेणार तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ
नवी दिल्ली : राओलाचे नेते म्हणून नरेंद्र मोदी हे रविवार ९ जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते. याआधी ७ किंवा ८ जून रोजी शपथविधी होईल, असे वृत्त येत होते.
शपथ घेतल्यावर मोदींचा पंतप्रधानपदाचा सलग तिसरा कार्यकाळ सुरू होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शपथविधी रविवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरू होणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
रालोआच्या बुधवारी झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर मोदींनी शुक्रवारी ७ जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे.
नव्या सरकारसमोर नवी आव्हाने देशात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होणार असले तरी यावेळेस परिस्थिती पूर्वीसारखी राहणार नाही. आता आघाडी सरकारमध्ये पंतप्रधान मोदींना अनेक मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालेले नाही.
सौजन्य- https://www.jaimaharashtranews.com
0 Comments