विरार रेल्वेस्थानकावरील इंडिकेटर गायब
विरार प्लॅटफॉर्म नंबर १च्या ब्रिजवरील रेल्वेचे इंडिकेटर कित्येक महिन्यापासून गायब
विरार - विरार प्लॅटफॉर्म नंबर १च्या ब्रिजवर रेल्वेने इंडिकेटर म्हणून एलडी स्क्रीन लावली होती. मात्र काही समाजकंटकांनी एलएडी स्क्रीन फोडून त्यातून सामान गायब केले होते. ब्रिजवर रात्री ११ वाजल्यानंतर सामसूम असते. जास्त रहदारी नसते. बाजूलाच पटरीत गर्दुले दबा धरून बसलेले असतात. त्यामुळे रात्री त्या ब्रिजवरून रहदारी कमी असते. याचाच फायदा घेत एकट्या दुकट्या प्रवाशाला मारहाण करून पाकिटातले पैसे काढून घेतले जातात. पैसे, मोबाईल, पाकीट दिले नाहीतर चाकूचा धाक दाखवून इजा पोचवायला गर्दुले मागपुढे पाहात नाहीत. अशा अनेक घटना कित्येक महिन्यांपासून घडत आहेत. त्यामुळे मनवेल पाडा रोडवरील प्रवाशांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
ब्रिजवर रेल्वेचे इंडिकेटर नसल्याने कुठल्या प्लॅटफॉर्मवर कुठली ट्रेन लागली आहे, याची माहिती मिळत आहेत. रविवारी मेगा ब्लॉक असतो त्यावेळी प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैससोय होते. तसेच तिकीटघर जवळ नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. तिकीट काढण्यासाठी १० मिनिटे चालत पुढे सबवे जवळ जावे लागते.रविवारी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते. परिणामी तिकीट काढण्यासाठी गर्दी असते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, सोयीसाठी, इंडिकेटर, तिकीटघर, गर्दुल्यानपासून सुरक्षा रेल्वे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून प्रवासी वर्गाची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
0 Comments