गिरीश महाजन महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत?
#girishmahajan #devendrafadanvis #maharashtrapolitics #bjp
मुंबई - लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला सेटबॅक बसल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असतानाच आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून महायुतीचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये यासाठी भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी प्रचंड प्रयत्न केले, मात्र देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर महाराष्ट्रात भाजपाचा उपमुख्यमंत्री कोण असेल, असा मोठा प्रश्न आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले नेते गिरीश महाजन यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. कारण सध्याच्या घडीला महाराष्ट्रात भाजपामध्ये गिरीश महाजन यांचे नाव आघाडीवर आहे.
अवश्य खरेदी करा - https://amzn.to/4eanH2Z
गिरीश महाजन हे सध्या राज्यातील भाजपाचे दोन नंबरचे नेते आहेत. त्यांची पक्षाचे संकटमोचक नेते म्हणून ख्याती आहे. याशिवाय ते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आपल्याला पक्ष संघटनेसाठी उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीपासून मुक्त करावे, अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या याच मागणीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्यासमोर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आखलेल्या प्लॅनची ब्लू प्रिंट सादर केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
![]() |
| जाहिरात - अमृता कलेक्शन |
विशेष म्हणजे या बैठकीनंतर आज पुन्हा अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राज्यात भाजपा ॲक्शन मोडवर आली आहे. भाजपा विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा जनादेश यात्रा काढणार आहेत. भाजपा संपूर्ण राज्यात जनादेश यात्रा काढणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनादेश यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. फडणवीस यांच्याकडून पक्ष संघटना, कामाची ब्ल्यू प्रिंट सादर करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय?
राज्यात देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे सध्याच्या घडीतील प्रमुख आणि सर्वात मोठे नेते आहेत. ते राज्याचे मुख्यमंत्रीदेखील होते. याशिवाय त्यांनी गृहमंत्रीपदही सांभाळले आहे. देवेंद्र फडणवीस हे डॅशिंग नेते आहेत. त्यांना लोकसभेत भाजपाचा झालेला पराभव जिव्हारी लागला आहे. आगामी काळात राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत भाजपाचे पुन्हा नुकसान होऊ नये यासाठी देवेंद्र फडणवीस आता पुन्हा शून्यातून महाराष्ट्रात प्रयत्न करणार आहेत.
![]() |
| जाहिरात- अभिज्ञान अकादमी |
ते राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांना आता सरकारमध्ये राहायचं नाही. त्यामुळे ते आपल्याकडे असणारी जबाबदारी कदाचित गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे.
गिरीश महाजनच उपमुख्यमंत्री म्हणून का?
गिरीश महाजन हे राज्यातील संयमी नेते आहेत. त्यांचे सर्व पक्षाच्या नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. ते नेहमी हसतमुख असतात. त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षांसोबत त्यांचे खूप सौहार्दाचे संबंध आहेत. ते उपमुख्यमंत्री राहिल्यास महायुतीतले मधुर संबंध कायम राहू शकतात. गिरीश महाजन यांचे भाजपामध्येदेखील सर्वांशी चांगले संबंध आहेत. कुठली अडचण असेल तर ती सोडवण्याची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे दिली जाते. दरम्यान फडणवीसांनी राजीनामा देण्याची गरज नाही आणि माझ्या उपमुख्यमंत्रीपदाचा विषयच नाही, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.
सौजन्य - रत्नागिरी वैभव साप्ताहिक
.png)



0 Comments